Sunday, May 8, 2011

पंडीत भीमसेन जोशी

24 जानेवारी 2011. पंडीत भीमसेन जोशी नावाचा भारतीय शास्त्रीय संगीतातील अमर सूर पंचत्वात विलिन झाला. संगीत हाच ध्यास आयुष्यभरासाठी घेतलेल्या पंडितजींच आपल्यात नसणं हे अतिशय क्लेशकारक आहे.

उत्तर कर्नाटकातील गदग नावाच छोटस गाव. पंडित अब्दुल करीमखान यांची बंदिश ऐकुन 12 वर्षाचा एक मुलगा भारावुन जातो. 'अस गाता आल पाहिजे' हे ठरवुन घरातुन पळुन जातो. रेल्वेमधे विनातिकिट प्रवास करत, अनेक भल्याबुर्‍या अनुभवांना सामोर जात थेट पोचतो ग्वाल्हेरला ! त्यानंतर सुरु होतो तो संगीताच्या ध्यासानी पछाडलेला एक अदभुत सांगितिक प्रवास, सहा दशकांच्या गानतपस्येचा! सच्ची निष्ठा आणी अफाट परिश्रम माणसाला कोणत्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात ते पंडितजींच्या वाटचाली कडे पाहिल की लक्षात येत. आज पंडितजींना स्मरताना आठवतो तो त्यांचा धीरगंभीर खर्जातला स्वर, गायनाची आक्रमक शैली, अक्षरशः भारतर गाण्याच्या कार्यक्रमांसाठी त्यांनी केलेली भ्रमंती, त्यांनी गाऊन अजरामर केलेली अभंगवाणी आणी आपल्या गुरुंच्या स्मरणार्थ पुण्यात जवळजवळ पाच दशक चालवलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव नावाचा स्वरयज्ञ !

शतका शतकातुन एकदा होणार्‍या या स्वरभास्कराला सर्व रसिकांतर्फे भावपुर्ण श्रध्दांजली.

No comments:

Post a Comment