आज भटांची गझल आठवली आणि स्वतःच्या काव्याविषयीचे त्यांचे हे शब्दही..मराठी काव्यक्षितिजावर एखाद्या वीजेच्या डोळे दिपवुन टाकणार्या कडकडाटाप्रमाणे तळपुन गेलेल्या या कवीला आणि त्यांच्या गझलेला स्मरुन...
माझीया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे
वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुल यावे
स्फंदने ज्ञानेश्वरांची माझीया वक्षात व्हावी
इंद्रियावाचुन मीही इंद्रिये भोगुन घ्यावी
एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला
नामयाहाती बनावे हे जीणे गोपालकाला
माझियासाठी जगाचे रोज जाते गरगरावे
मात्र मी सोशीन जे जे ते जनाईचे असावे
मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे
चोखवे वारात माझ्या मी मला वाहुन द्यावे
याविना काही नको रे एवढे दे पांडुरंगा
याचसाठी मांडला हा मी तुझ्या दारात दंगा
No comments:
Post a Comment