बाबुजी - सुधीर फडके आणी ग.दि.माडगुळकर ही मराठी भावसंगीतातील उंच शिखरं. त्यांच्या सुवर्णसहयोगानी अनेक अविस्मरणीय गाणी आणी गीतरामायणासारखी अजरामर कलाकॄती निर्माण झाली . सुरवातीच्या एका गीतरामायणाच्या महोत्सवात ग.दि.मांनी पत्ररुपानी पाठवलेलं गीतरामायणाविषयीचं त्यांचं हे काव्यमय मनोगत..
अजाणतेपणे केव्हा, माता घाली बालगुटी
बीज धर्माच्या दॄमाचे, कणकण गेले पोटी
छंद जाणतेपणीचा, तीर्थे काव्याची धुंडिली
कुण्याएका भाग्यवेळी, पुजा रामाची मांडिली
देववाणीतले ओज, शीतळले माझ्या ओठी
वाल्मिकीच्या भास्कराचे, झाले चांदणे मराठी
झंकारल्या कंठवीणा, आले चांदण्याला सुर
भावमाधुर्याला आला, महाराष्ट्रीय महापुर
चंद्रभारल्या जिवाला, नाही कशाचीच चाड
मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड
- ग. दि. माडगुळकर
अजाणतेपणे केव्हा, माता घाली बालगुटी
बीज धर्माच्या दॄमाचे, कणकण गेले पोटी
छंद जाणतेपणीचा, तीर्थे काव्याची धुंडिली
कुण्याएका भाग्यवेळी, पुजा रामाची मांडिली
देववाणीतले ओज, शीतळले माझ्या ओठी
वाल्मिकीच्या भास्कराचे, झाले चांदणे मराठी
झंकारल्या कंठवीणा, आले चांदण्याला सुर
भावमाधुर्याला आला, महाराष्ट्रीय महापुर
चंद्रभारल्या जिवाला, नाही कशाचीच चाड
मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड
- ग. दि. माडगुळकर
No comments:
Post a Comment